
कणकवली : पालकमंत्री नितेश राणेंनी देवगड तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. उबाठा युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला हा प्रवेश कार्यक्रम येथील ओम गणेश निवासस्थानी पार पडला. यावेळी माजी आमदार अजित गोगटे उपस्थित होते. निनाद देशपांडे यांच्यासह शाखाप्रमुख राजेंद्र शिरोडकर, बूथप्रमुख घननीळ कणेरकर, शाखाप्रमुख प्रदीप पडेलकर, बूथप्रमुख भालचंद्र पारकर, शाखाप्रमुख गणपत जाधव, बूथप्रमुख प्रवीण जाधव, शाखाप्रमुख ओंकार लाड, बूथप्रमुख गणपत लाड, बूथप्रमुख सुरज भिडे, शाखाप्रमुख दिनेश परब, बूथप्रमुख जनार्दन कोयंडे, तसेच बबन आदी पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
निनाद देशपांडे म्हणाले, आम्ही नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजप मध्ये प्रवेश केला आहे. विकास आणि जनतेच्या प्रश्नाची जाण असलेले नेतृत्व नितेश राणे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेसाठी सक्रिय काम करू, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.











