माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या रक्तदान शिबीर

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: March 23, 2026 19:27 PM
views 11  views

कणकवली : कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मंगळवार, २४ मार्चला सकाळी ९ वाजता  कणकवली येथील श्रीधर नाईक चौक येथे रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. तसेच शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. शिवसेना,  युवासेना,महिला आघाडीच्या  पदाधिकारी व शिवसैनिक यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना कणकवली तालुका कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.