
कणकवली : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या सुशासन युक्त प्रशासन संकल्प अंतर्गत कलमठ गावातील विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांसाठी ग्रामपंचायत कलमठ आणि ग्राम महसूल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हयात दाखल्यांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि दिव्यांग योजना लाभार्थ्यांना हयात दाखल्यांचे मिळून ७० दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना सरपंच संदीप मेस्त्री म्हणाले, गावातील सर्व विविध योजनांच्या लाभार्थ्यांना विविध शासकीय कामासाठी लागणारे सर्व प्रकारचे दाखले सहजतेने उपलब्ध व्हावेत यासाठी कलमठ ग्रामपंचायत नेहमी प्रयत्नशील असते आणि प्रत्येक योजनांच्या लाभार्थ्यांसाठी आणि शैक्षणिक दाखल्यांसाठी ग्रामपंचायत अशा शिबिरांचे आयोजन करते, त्याचाच एक भाग म्हणजे आजचा हयात दाखला शिबिर कार्यक्रम आहे.
कार्यक्रमाचे शुभारंभ सरपंच संदीप मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर, उपसरपंच दिनेश गोठणकर, ग्राम महसूल अधिकारी सौ गोजिरी गोडे, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, माजी पंचायत समिती सदस्य महेश लाड, माजी उपसरपंच स्वप्निल चिंदरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. यावेळी ग्रामपंचायत सदस्या स्वाती नारकर, नितीन पवार, अनुप वारंग, श्रेयस चिंदरकर, कोतवाल उत्तम अडुळकर आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











