
कणकवली : कणकवली तालुक्यातील कलमठ मुस्लिमवाडी येथील अबिद शहा यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रतिष्ठेची मानली जाणारी GATE (Graduate Aptitude Test in Engineering) परीक्षा पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एस एस पी एम कणकवली कॉलेजचा हा विद्यार्थी असून अबिद शहा यांच्या या यशामुळे कुटुंबियांसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चाणक्य कोचिंग क्लास गणेश काटकर, तुषार म्हापसेकर रोहित म्हापसेकर, हर्षद पारकर, भाविका सावंत व शीतल काटकर यांनी शहा यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या अबीद यांनी आपल्या सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले असून, त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
GATE परीक्षा उत्तीर्ण होणे हे अभियांत्रिकी क्षेत्रातील उच्च शिक्षण तसेच नामांकित संस्थांमध्ये प्रवेश आणि चांगल्या करिअरसाठी महत्त्वाचे मानले जाते. अबिद शहा यांच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे.त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.










