
दोडामार्ग : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माझी वसुंधरा ५. ० अभियानात पुरस्कार प्राप्त करून राज्यात डंका मारणाऱ्या दोडामार्ग तालुक्यातील घोटगे ग्रामपंचायत चा मुंबई परेल येथे राज्याचे पर्यावरण व वातावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला.
राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान मध्ये राज्यभरातील २६९०० ग्रामपंचायतीने सहभाग घेतला होता. या अभियानात दोडामार्ग मधील घोटगे ग्रामपंचायतने सहभा घेऊन पर्यावरण पूरक व अनेक विकास कामे करून या अभियाना अंतर्गत आपल्या गावाचे नाव रोशन केले आहे. मुंबई परेल येथे सरदार वल्लभ भाई पटेल स्टेडियम येथे पुरस्कार प्राप्त ग्रामपंच्यातचा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष राज्यपाल डॉ. आचार्य देवव्रतजी, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यावरण व वातावरण मंत्री पंकजाताई मुंडे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, प्रशासकीय अधिकारी जयश्री भोजी, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य राजेश अग्रवाल, प्रवीण कुमार, प्रशांत ननवरे, सहसचिव एस राममूर्ति, एम देवेंद्र सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी घोटगे ग्रामपंचायतचे सरपंच भक्ती भरत दळवी, उपसरपंच विजय दळवी, सदस्य अजय दळवी, समीक्षा दळवी, ग्रामसेवक विष्णू सावंत, ग्रामस्थ भरत दळवी, श्याम पुनाजी दळवी, आनंद नारायण दळवी, ग्रामसेवक, लाडू नारायण दळवी, मंगेश सातू दळवी, शिवराम बाबी दळवी, संतोष कृष्णा परब, मनोहर महादेव दळवी, आपा नामदेव दळवी, प्रवीण पांडुरंग दळवी, प्रमोद अमृत दळवी, वासुदेव शिवराम दळवी, सत्यवान सुरेश दळवी, संतोष पांडुरंग दळवी, पत्रकार लवू परब आदी उपस्थित होते.
पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा : राज्यपाल आचार्य देवव्रतजी
कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष राज्यपला अध्यक्षीय भाशण बोलताना म्हणाले की या जगात पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. अतिरुष्टी, पूर, डोंगर कोसळणे भूकंप याला सर्वस्वी आपण माणूसच जबाबदार आहोत. आणि हे सर्व घटक भविष्यासाठी शुभचिंतक नाही आहेत. त्यामुळे आपल्याला आपली येणारी पिढी वाचवायची असेल तर आपणच सर्वांनी पर्यावरण वाचावल पाहिजे यासाठी ग्रामपंचायत स्थरावर पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्न करा. आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा.
भविष्याच्या पिढीचा विचार करून विकास करा :- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
आपण गावचा विकास करत असतोच पण गावाचा विकास असा करा की येणारी भविष्यातील पिढीने आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे कारण आज आपण विकास करत असताना पर्यावरणाचा भकास करून ठेवला आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार म्हणजे आपणच आहोत. पर्यावरणाचा भकास न करता स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेऊन पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवावा गावाचा विकास करताना शाश्वत पर्यावरण पूरक विकास करावा असे आदरणीय अजितदादा पवार यांचे स्वप्न होते. त्यामुळे जनतेमध्ये शाश्वत शैली चा प्रचार करा आणि येणाऱ्या पिढीला वाचून ठेवण्याचा प्रयत्न करा.
पर्यावरण वाचवण्याची आपलीच जबाबदारी : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
पृथ्वी आपली माँ आहे आणि ही मा आपल्या पोटात पाणी, जमीन, आकाश, वायू, आग या पाच तत्वांना आपल्या पोटात घेऊन वावरणारी म्हणजे आपली भूमीमाँ आहे. आपण सर्वजण माझी वसुंधराचे मानकरी झालात पण पर्यावरण हा अत्यंत गंभीर विषय आहे. पर्यावरण वाचवण्याचे आपली जबाबदारी आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जमीन, झाडे, पाणी, सोनं, चांदी अशा अनेक गोष्टी आपल्यासाठी ठेवले आहेत. पण आता आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काय ठेवले आहे. आपल्याला आपल्या पुढच्या पिढीसाठी पिण्यासाठी पाणी शेती करण्यासाठी जमीन, आपल्याला श्वास घेण्यासाठी योग्य अशी हवा ठेवायची आहे. हे आपल्याला आपल्या पुढच्या पिढीसाठी ठेवायचं आहे. आपण या भुग्रभातून पाणी, हवा, अग्नी, सोन, चांदी, पेट्रोल, डिझेल, अशा अनेक वस्तू घेत आहोत. मात्र आपण या भुगर्भाला काय देत आहोत. त्यामुळे आताच विचार करा आणि पर्यावरण वाचवण्यास साठी पूर्णपणे प्रयत्न करा.
फोटो :- घोटगे ग्रामपंचायतला पुरस्कार प्रदान करताना राज्याचे पर्यावरण व वातावरण










