
कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे - रविवार ०४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता. सुवर्णगड, मुंबई येथून सांताक्रुझ विमानतळाकडे प्रयाण, सकाळी १०.०० वा. जनरल एव्हीएशन विमानतळ, सांताक्रूझ येथे आगमन व विमानाने मोपा, गोव्याकडे प्रयाण, सकाळी ११.४५ वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण, दुपारी ०२.३० वा. खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांच्या स्वागतासाठी बांदा ते कणकवली दरम्यान स्वागत रॅलीस उपस्थिती. ( स्थळ : बांदा ते कणकवली ), सायं.६.०० वा. खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे, यांचे समवेत सभेस उपस्थिती. ( स्थळ : उपजिल्हा रुग्णालयासमोर, कणकवली, जि. सिंधुदुर्ग ), रात्रौ ०८.३० वा. यंगस्टार मित्रमंडळ आयोजित "वैभववाडीश्री" यास उपस्थिती ( स्थळ : वैभववाडी बाजारपेठ, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ), रात्रौ ०९.३० वा. पंचक्रोशी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, फोंडाघाट तर्फे जिल्हास्तरीय निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनास उपस्थिती. ( स्थळ : सावंत-पटेल ग्राऊंड, बिजलीनगर, मु.पो. फोंडाघाट, ता. कणकवली ), रात्री ११.०० वा. श्री देवी भगवतीचा वार्षिक जत्रौत्सव २०२६ यास उपस्थिती. ( स्थळ: श्री देवी भगवती मंदिर, मुणगे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग ) असे त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.










