
कणकवली : वरवडे येथील मूळ रहिवासी सध्या कलमठ बाजारपेठ येथे स्थायिक झालेल्या जि. प. च्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका स्मिता सुभाष पोयेकर (७१) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने रात्री निधन झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक जि. प. शाळांमध्ये त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले. मनमिळावू स्वभाव व परोपकारी वृत्तीमुळे त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या. पोयेकर बाई म्हणून त्या सर्वत्र परिचित होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून असा परिवार आहे. सेवानिवृत्त शिक्षक सुभाष पोयेकर यांच्या पत्नी तर श्याम पोयेकर यांच्या त्या मातोश्री होत. कलमठ-बिडयेवाडी येथील स्मशानभूमीत शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.