
कणकवली : मुंबई विद्यापीठांतर्गत ५८ वा युवा महोत्सव कुडाळ संत राऊळ महाविद्यालयात नुकताच संपन्न झाला. या युवा महोत्सवात कणकवली महाविद्यालयाने ३५ कला प्रकारात सहभाग नोंदवला होता. साहित्य, ललित कला, नाट्यकला, संगीत कला आणि नृत्यकला या विविध कलाप्रकाराचे सादरीकरण करण्यात आले. यात २० विविध कलाप्रकारांत महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे.
महाविद्यालयाने सादर केलेल्या कोलाज, मातीकाम, कथाकथन हिंदी, वकृत्य हिंदी, एकपात्री मराठी, एकपात्री हिंदी, प्रहसन हिंदी, एकांकिका हिंदी, भारतीय शास्त्री नृत्य या कलाप्रकारांना प्रथम क्रमाक, भारतीय लोकनृत्य, समूहगीत यांना द्वितीय तर एकपात्री मराठीला तृतीय क्रमांक मिळाला. वकृत्व मराठी, वादविवाद इंग्रजी, मिमिक्री, भारतीय सुगम गायन यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.
या कलाप्रकारात सादरीकरण करणाऱ्या सर्व कलाप्रेमी विद्यार्थांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, चेअरमन प्रा. डॉ राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू,प्राचार्य युवराज महालिंगे यांनी अभिनंदन केले आहे. हा युवा महोत्सव यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. सीमा हडकर, जिल्हा समन्वय प्रा. डॉ. आशिष नाईक, प्रा. हरीभाऊ भिसे, प्रा. सचिन दर्पे, प्रा. संदिप तेली, प्रा. मिनाक्षी सावंत, प्रा.सुकन्या तांबे, प्रा. डॉ. गीता कुणकवणेकर, प्रा. डॉ. सुरेश हुसे, प्रा.प्रविण कडूकर, प्रा. विजय सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. सांस्कृतिक विभागातील सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. सीमा हडकर व सर्व सदस्यांचे, विद्यार्थ्यांचे संस्था चेअरमन प्रा. डॉ .राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू , प्राचार्य युवराज महालिंगे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.