आयनल नागेश्वर सोसायटी संचालकपदी भालचंद्र साटम बिनविरोध

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 28, 2025 12:05 PM
views 245  views

कणकवली : नागेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, आयनलच्या एका रिक्त संचालक पदावर भालचंद्र साटम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या कार्यालयात या संदर्भात बैठक घेण्यात आली. संस्थेच्या संचालकांपैकी एक जागा रिक्त असल्याने, त्या जागेसाठी निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र, संचालक पदासाठी भालचंद्र साटम यांचा एकमेव अर्ज आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रावजी चिंदरकर, उपाध्यक्ष सुधीर लाड, संचालक मनोहर चव्हाण, भगवान मसुरकर, प्रवीण साटम, प्रकाश सावंत, दशरथ दहिबांवकर, सुरेश मुणगेकर, सुशांत चव्हाण, भास्कर लोके, गीता चव्हाण, संगीता चव्हाण, माजी सरपंच बापू फाटक, दाजी ओटवकर, सचिव नंदकुमार देवलकर आदी उपस्थित होते.