
कणकवली : नांदगाव ग्रामपंचायतच्या पंधरावा वित्त आयोग अंतर्गत नांदगाव तिठा ब्रिज खाली बांधलेल्या वॉटर एटीएम चे उद्घाटन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री शिंदे यांच्या हस्ते फित कापून तर नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. आता नांदगाव तिठा येथे प्रवाशांना १ रुपयांत १ लिटर फिल्टर थंडगार पाणी मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, नांदगाव उपसरपंच इरफान साटविलकर, विस्तार अधिकारी पंचायत समिती कणकवली आर. एल. शिंदे,कृषी अधिकारी श्री शशिकांत सुधाकर, भरसट तसेच कृषी विस्तार अधिकारी श्री विशाल शिंदे, श्री संजय कवटकर श्री प्रमोद ठाकूर, ग्रामपंचायत अधिकारी आर.डी सावंत, ग्रामपंचायत सदस्य विनोद मोरये, अनिकेत तांबे, संतोष बिडये, पुजा सावंत, गौरी परब, तसेच संतोष जाधव,राजू तांबे, व्यापारी संघटना प्रभारी अध्यक्ष रज्जाक बटवाले, रिक्षा संघटना अध्यक्ष विलास कांडर आदी बहुसंख्येने ग्रामस्थ रिक्षा संघटना पदाधिकारी उपस्थित होते.