कणकवली येथील परमपूज्य अनुसया माता यांचे अल्पशा आजाराने निधन

Edited by:
Published on: December 25, 2023 10:40 AM
views 271  views

कणकवली : कणकवली नागवे रोड येथील विश्रांतीधामच्या फलाहारी महाराज यांच्या शिष्या परमपूज्य अनुसया माता यांचे रविवारी सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. प .पू.अनुसया माता यांचे अंत्यदर्शन सोमवारी सकाळी ११ ते १ वाजण्याच्या मुदतीत ठेवण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना समाधी देण्यात  येणार आहे. त्यांच्या दुःखद निधनानामुळे भाविक भक्तांवर दुःखाचा  डोंगर कोसळला आहे. त्यांच्या दुखद निधनामुळे आपली माय माऊली गेल्याची भावना भाविकांमध्ये निर्माण झाली आहे.