कुडाळ देशकर गौड ब्राह्मण समाजाचा जिल्हा महिला मेळावा उत्साहात

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 14, 2026 11:02 AM
views 186  views

कणकवली : सातवा आद्य कुडाळ देशकर गौड ब्राह्मण समाज जिल्हा महिला मेळावा पूर्णानंद भवन फोंडाघाट येथे दिनांक १२ एप्रिल रोजी अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे साडेचारशे महिला उपस्थित होत्या. मेळाव्याचे उद्घाटन रत्नागिरीचे लोकप्रिय आमदार बंधु उदय आणि भैय्या सामंत यांच्या मातोश्री आणि सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य नाव व्यावसायिक श्री. आर. डी. उर्फ अण्णा सामंत यांच्या सुविद्य पत्नी सौ. स्वरूपा सामंत, गोवा येथील झायडस फार्मा या नामांकित औषध निर्मिती कंपनीच्या महाप्रबंधक वर्षा हवालदार, गोव्यातील नामांकित कॉलेजमध्ये प्राध्यापक असणाऱ्या डॉ. शिल्पा सामंत कर्तबगार महिलांच्या हस्ते स्वागताध्यक्षा सौ. प्रतिभा अवसरे आणि पूर्णानंद महिला मंचच्या अध्यक्षा सौ सुलभा सामंत यांच्या उपस्थितीत झाले. ज्ञातीच्या महिला मंडळाच्या जिल्हाध्यक्षा सौ. अरुणा सामंत या सुद्धा याप्रसंगी हजर होत्या. 

प्रमुख पाहुण्या डॉ. शिल्पा सामंत आणि वर्षा हवालदार परूळेकर यांनी आपल्या भाषणात महिलाना अतिशय वास्तवपूर्ण आणि महिला सक्षम होण्याच्या दृष्टीने बहुमोल मार्गदर्शन केले. सौ. स्वरूपा सामंत यांची सौ. रामेश्वरी दाभोलकर यांनी मोजक्याच प्रश्नात पण लक्षवेधी अशी  मुलाखत घेतली आणि सौ स्वरूपा सामंत यांनी समयोचित उत्तरे देऊन सर्वांकडून वाहवा मिळविली. स्वागताध्यक्षा सौ. प्रतिभा अवसरे आणि सौ सुलभा सामंत यांनी आपापली मनोगते थोडक्यात व्यक्त केली. अंगणवाडी कर्मचारी तारणहार कमलताई परूळेकर यांना मानपत्र अर्पण करून त्यांचं विशेष सत्कार करण्यात आला. कमलताईनी अत्यंत समर्पक शब्दात मनोगत व्यक्त केले.

यानंतर ज्ञातीतील अनेक व्यावसायिक आणि प्रतिभावान भगिनींचा यथोचित सत्कार केला. 

यामध्ये निशा दिनेश केळूसकर,सुखी श्रीकृष्ण सामंत,अॅड. समीरा संदेश प्रभू,सौ. सीमा सतीश परूळेकर,प्राजक्ता राजाराम गवाणकर,सौ. स्वाती रविंद्र वालावलकर, आरती हरिश्चंद्र पाटील, चिन्मया ठाकूर (देवगड), सरिता दिवाकर  आंबेसकर,  सौ. सविता सुनील महाजन, मुणगे, कमलताई परूळेकर, सौ. संपदा शांताराम पाटील यांचा समावेश होता. दुपारच्या सत्रात विविध मनोरंजनाचे कार्यक्रम मात्र ते महिला केंद्रित समाजप्रबोधन करणारे असे सादर करण्यात आले. यात कीर्तन, एकपात्री प्रयोग, समूह गीत, दशावतार नाट्य प्रयोग, स्वामी रचित तारक मंत्र आदि कार्यक्रम होते. सर्व  महिलांसाठी करमणुकीचे विविध खेळ सुद्धा आयोजित केले होते.  मेळाव्यास श्री. रणजीत देसाई, मनोज वालावलकर, अमित तेंडुलकर आणि कुडाळ युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी सदिच्छा भेट दिली.   शेवटी लकी ड्रॉ सोडत आणि अभारप्रदर्शनाने मेळाव्याची सांगता झाली. महिलांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्या देवदत्त सामंत, शिल्पा मनीष दाभोलकर, मंदाताई दिलीप सामंत, राखी दाभोलकर, नयना राजन नाईक आदींचा समावेश होता. 

केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यातील  राजापूर, नाणार, कुंभवडे, पडवे , तारळ  आदि गावातून अनेक महिला उपस्थित होत्या. देवगड तालुक्यातील मुणगे आणि राजापूर तालुक्यातील पडवे या गावातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. आयोजक पूर्णानंद महिला मंचाच्या सर्व पदाधिकाऱ्यानी सर्वांचे आभार मानले आहेत.