
कणकवली : कणकवली शहरात मोकाट व भटक्या जनावरांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्याच्या कडेला अथवा हायवेसह शहरातील विविध ठिकाणी उभी असलेली वाहनांना ही जनावरे धडक देत असल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे. अचानक धडक, आरसे तुटणे, गाड्यांच्या चकत्या व दरवाजांना झालेली हानी अशा अनेक तक्रारी वाहनधारकांकडून समोर येत आहेत. शहरातील भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत असून संबंधित प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः हायवेवर पार्किंग केलेल्या वाहनांच्या नुकसानीस जबाबदार कोण ? याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. प्रशासनाने योग्य तो निर्णय घेऊन त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.










