
कणकवली : फोंडाघाट - झर्येवाडी येथील प्रथितयश शेतकरी सदाशिव बाळू बाणे ( वय - ८२ ) यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळातील आजारपणामध्ये निधन झाले. सदाशिव यांनी एका नामवंत पेढीवर दिवाणजी म्हणून काम केले होते. सोबत विविध भाजीपाला, फळे, कंदमुळे यांच्यावर संशोधनात्मक शेती करून कृषीतज्ञ म्हणून ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, पाच मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.










