शहर विकास आघाडीच्या व्यासपीठावर भाषण देणारे डॉ. संदीप नाटेकर पालकमंत्र्यांसोबत

कणकवली शहरात नाट्यमय घडामोडींना वेग
Edited by: उमेश बुचडे
Published on: November 26, 2025 19:55 PM
views 14  views

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत दिवसागणित घडामोडी बदलत असतानाच दोन दिवसांपूर्वी कणकवली शहरामध्ये कणकवली शहर विकास आघाडीची कॉर्नर सभा झाली होती. या कॉर्नर सभेमध्ये माजी नगरसेवक डॉ. संदीप नाटेकर हे कणकवली शहर विकास आघाडीच्या व्यासपीठावर जात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.  या भूमिके नंतर संदीप नाटेकर हे शहर विकास आघाडीच्या गळाला लागल्याची चर्चा कणकवली शहरात सुरू झाली होती. परंतु त्यानंतर आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे कणकवली शहरात काही वैयक्तिक गाठीभेटी घेण्याकरता फिरत असताना त्यांच्यासोबतच डॉ. संदीप नाटेकर हे कणकवलीतील प्रतिष्ठित व्यापारी दीपक बेलवलकर यांच्या निवासस्थानी पालकमंत्री नितेश राणे सोबत उपस्थित असल्याचे दिसून आले. दोन दिवसांपूर्वी शहर विकास आघाडीच्या व्यासपीठावर असणारे डॉ. नाटेकर हे आज पालकमंत्री नितेश राणेंसोबत दीपक बेलवलकर यांच्या निवासस्थानी एकत्र दिसल्याने हा कणकवली शहर विकास आघाडीला दिलेला शह असल्याचे बोलले जात आहे.