
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाकरिता एक व नगरसेवक पदाकरिता 17 उमेदवार रिंगणात असताना या सर्वच उमेदवारांना एकच चिन्ह मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्व उमेदवारांना नारळ चिन्ह प्राप्त झाले आहे.
नोंदणीकृत राजकीय पक्षांना आता नगराध्यक्ष व नगरसेवक पदाकरिता एकच चिन्ह देण्याबाबतच्या सूचना आहेत. त्यामुळे कणकवली शहर विकास आघाडीला यापूर्वी नगराध्यक्ष पदाकरिता एक व नगरसेवक पदाकरिता वेगळे अशी दोन चिन्हे मिळण्याची शक्यता होती. परंतु ती आता दूर झाली असून शहर विकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना नारळ हे चिन्ह मिळाले आहे. शहरी विकास आघाडीला नगराध्यक्ष व 17 नगरसेवकांकरिता एकच चिन्ह मिळाले आहे. लोकराज्य जनता पार्टी कडून नगराध्यक्ष पदाकरिता गणेशप्रसाद पारकर हे उमेदवार रिंगणात आहे. त्यांना चिठ्ठी उडवून कपबशी चिन्ह मिळाले. तर शहर विकास आघाडी कडून संदेश पारकर हे उमेदवार क्रांतिकारी विचार पक्षाच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात आहेत.










