वैभव नाईक यांच्या कणकवलीतील घरात बोगस मतदार..?

विश्वजित रासम यांची तक्रार
Edited by: विनायक गांवस
Published on: November 24, 2025 17:40 PM
views 533  views

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणूक मध्ये आता बोगस मतांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. उद्धव ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या घरामध्ये बोगस मतदार असल्याची तक्रार विश्वजित विजयराव रासम यांनी  निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, कणकवली नगरपंचायत निवडणूक सन २०२५ सुरू झालेली असताना कणकवली शहर वार्ड क्रमांक १५ मधील एकाच घरक्रमांक तसेच एकाच पत्यावर विविध मतदारांची नोंद असल्याचे मतदार यादी मधून दिसून येत आहेत. वार्ड क.१५ नुसार घरक्रमांक ८४ मध्ये १) महेशवाडी जा बागाप्पा २) शिवाप्पा तिवान्ना नाईक ३) परशुराम महादेव नाईक ४) तुकाराम अन्नाप्पा नाईक ५) पुलाबाई परशुराम नाईक ६) चंद्रकांत रामचंद्र पाटील ७) अनिल मोहन सावंत ८) अनिता अनिल सावंत ९) शंकर भगवान शिपे १०) सुनया शंकर शिपे आदी नावे ही एकाच घरक्रमांक ८४ मध्ये नमुद असून सदर घर हे माजी आमदार वैभव विजय नाईक यांच्या नावावर असल्याचे दिसून येत आहे. व वरील नावे व असलेले मतदार प्रत्यक्षात त्या ठिकाणी राहत नसल्याचे समजते याचा अर्थ असा की, सदर घरक्रमांक मध्ये अवैधरित्या किंवा अनधिकृतपणे मतदारांची नावे नमुद करून बोगस मतदान होण्याची दाट शक्यता आहे. तरी वरील नावांची आणि घरक्रमांकमधील मतदारांची चौकशी व्हावी तसेच मतदान सर्वेसाठी असलेले (BLO) बी एल ओ याला जबाबदार आहेत तरी वरील सर्व मतदारांची चौकशी करण्यात यावी आणि बोगस मतदान होण्याची दाट शक्यता आहे. कारवाई करण्यात यावी. अशी मागणी आश्रम यांनी कणकवली निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे