
कणकवली : कणकवली शहर भाजप व समीर नलावडे मित्र मंडळ यांच्यातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे दिवाळी बाजाराचे आयोजन कणकवली येथील पेट्रोल पंपासमोर उड्डाण पुलाखालील जागेत करण्यात आले आहे. हा दिवाळी बाजार १५ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत असणार आहे. दिवाळी बाजारात विशेषतः कणकवली शहरातील बचतगटाच्या महिलांनी स्वतः बनविलेल्या वस्तू तसेच कुंभार समाज बांधवांनी बनविलेल्या मातीच्या वस्तू विक्रीस उपलब्ध असणार आहेत. दिवाळी बाजारात एकूण ४० स्टॉल असणार असून दिवाळी बाजाराचा शुभारंभ १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली येथील भाजप शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. नलावडे बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, किशोर राणे, बाबू गायकवाड, माजी नगरसेवक अभिजीत मुसळे, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, गौरव हर्णे आधी उपस्थित होते.
नलावडे म्हणाले, कणकवली शहरातील बचतगटाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या महिलांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आम्ही दिवाळी बाजाराचे आयोजन करत असतो. दिवाळी बाजाराचे हे सलग आठवे वर्ष आहे. तत्कालीन आमदार व विद्यमान पालकमंत्री नीतेश राणे यांच्यासह आमच्यावर विश्वास ठेवून कणकवली शहरवासीयांनी आमच्याकडे सत्ता दिली होती, तेव्हापासून आम्ही दिवाळी बाजार तसेच अन्य वेगवेगळ्या महोत्सवांचे आयोजन करत आलो आहोत.
दिवाळी बाजारामध्ये बचत गटाच्या महिलांनी बनविलेला फराळ हाताने, बनविलेली कंदील, कुंभार समाज बांधवांनी हाताने तयार केलेली विविध भांडी, पणत्या असे साहित्य विक्रीस असणार आहे. बचत गटाच्या महिलांना ३० तर कुंभार समाज बांधवांना १० असे एकूण ४० स्टॉल दिवाळी बाजारात असणार आहेत. या सर्व विक्रेत्यांसाठी टेबल, खुर्च्या, लाईटची व्यवस्था आम्ही मोफत करणार आहोत, असेही नलावडे यांनी सांगितले.
दिवाळी बाजाराचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या कणकवली शहरातील बचत गटाच्या महिलांनी तसेच कुंभार समाज बांधवांनी नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी भाजप शहराध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे (९४२२३८१९००) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही नलावडे यांनी केले.










