
कणकवली : गणेशोत्सव काळात राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी शहरात ठिकठिकाणी लावलेले बॅनर्स सोमवारी दिवसभरात नगरपंचायतीच्या कर्मचाºयांनी हटविले. या कारवाईमुळे शहरातील काही चौक बॅनरमुक्त झाले आहेत. शहरात अन्य ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर्स मंगळवारी हटविले जाणार आहेत.
गणेशोत्सव काळात शहरात राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी न. पं. ची परवानगी घेऊन लावले होते. न. पं. कडून सदर बॅनर्स लावण्याबाबत काही दिवसांची मुदत दिली जाते. ही मुदत संपल्यानंतर न. पं. चे कर्मचारी बॅनर्स जप्त करतात. त्यानुसारच सोमवारी ही कारवाई करण्यात आली. दिवसभरात २५ ते ३० बॅनर्स हटविण्यात आले. बॅनर हटविण्याच्या कारवाईत न. पं. कर्मचारी मुकेश तांबे, अजय तांबे, राजेश तांबे, नंदकुमार जाधव, सुधीर तांबे आधी सहभागी झाले होते.










