
कणकवली : रेल्वेस्थानक परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आणि रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील नरडवे रस्त्यापासून रेल्वेस्थानकापर्यंत जाणाऱ्या जोडरस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. मान्सूनपूर्व पावसाचे पाणी खड्डयांमध्ये साचले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड बनले आहे.
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. गर्दीच्यावेळी वाहनचालकांना हाल सोसावे लागणार आहेत. त्यामुळे कणकवली रेल्वे स्थानक परिसर सुशोभीकरणाचे काम मंजूर झाले आहे. पण अजून पर्यंत त्या कामाला सुरुवात झाली नसल्याने ते काम कधी सुरू होणार असा प्रश्न प्रवासी व वाहन चालकांकडून उपस्थित होत आहे.कारण सध्या स्थितीत या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्याची मागणी प्रवासी व वाहन चालकांमधून होत आहे.