नऊ वर्षांच्या मुलाचा काही तासातच कणकवली पोलिसांनी लावला शोध..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 27, 2023 17:39 PM
views 631  views

कणकवली : कणकवली टेंबवाडी येथील नव वर्षीय मुलगा दुपारीच्या सत्रामध्ये घरातून न सांगता निघून गेला. घरातल्यांनी त्याचा शोधा घेतला असता तो सापडून आला नाही. म्हणून नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधला असता स्वतः पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी तत्परतेने नातेवाईकांना सोबत घेऊन त्या मुलाचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली.

गांगो मंदिर टेंबवाडी व बाजारामध्ये शोधकार्य सुरू असताना बस स्टँन्ड कडे जाणाऱ्या रस्ते शेजारी तो आढळून आला पोलीस निरीक्षण अमित यादव यांनी त्या मुलाला ताब्यात घेऊन नातेवाईकांना सुपूर्त  केले. पोलिसांनी तत्पर देणे केलेले शोध कार्यामुळेच हा मुलगा आज सापडून आल्याने पोलिसांच्या या तत्परतेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.