जनसुरक्षा विधयेकावर चर्चासत्र

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: October 01, 2025 21:40 PM
views 33  views

कणकवली : भारताची राज्यघटना कोणतेही सरकार बदलू शकणार नाही. सध्या केंद्र सरकार हे राज्यघटना बदलणार असा फेक नॅरेटिव्ह विरोधकांकडून समाजात पसरविला जात आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही, ही संविधानाची भारताची मोठी ताकद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेचीनिमित्त करताना लोकशाहीच्या चार स्तंभांमध्ये समतोलपणा सांभळाला आहे. देशातील एकता आणि अखंडितेला अर्बन नक्षलवादापासून सर्वांधिक धोका आहे. अर्बन नक्षलवादाला रोखण्यासाठी महाराष्ट्रातील सरकारने जनसुरक्षा विधेयक कायदा आणला आहे. हा कायदा कोणाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणारा नव्हे तर लोकहितवादी आहे. महाराष्ट्रातील जनतेने या कायद्याचा प्रभावीवापर करून अर्बन नक्षलवादाला अर्थिक रसद व खतपाणी घालणाºयांना रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अ‍ॅड. संदीप जाधव यांनी केले. 

जानवली येथील नीलम कंट्रीसाईट येथे अ‍ॅड. संदीप जाधव यांचे जनसुरक्षा विधेयकावर चर्चासत्र आयोजित केले होते. याप्रसंगी अ‍ॅड. जाधव बोलत होते. यावेळी जिल्हापत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, डॉ. मिलिंद कुलकर्णी हे उपस्थित होते. अ‍ॅड. जाधव म्हणाले, देशातील पश्चिम प्रांतातून नक्षलवादाचा उदय झाला. ग्रामीण भागात नक्षलवादाचा प्रभाव होता. अलीकडच्या काळात शहरी नक्षलवाद वाढू लागला आहे. नक्षलवादी चळवळीत काम करणाºयांची माओवादी विचारसरणी आहे. ही विचारसरणी हिंसेचे समर्थन करते. २००४ ते २०१४ या काळात नक्षलवादाला खत व पाळबळ देण्याचे काम काँग्रेस सरकारने केले. त्यामुळे नक्षलवाद देशभरात फोपवला. २०१४ नंतर केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले. या सरकारने देशाला कीड लागेलल्या नक्षलवाद बीमोड करण्याचा निर्धार केला. १० वर्षांत ग्रामीण भागतील नक्षलवाद कमी झाला असून शहर अर्थात अर्बन नक्षलवाद देशासाठी सर्वांधिक घातक आहे. या वादाला रोखण्यासाठी देशातील काही राज्यांनी जनसुरक्षा विधेयक कायदा लागू केला आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर त्या राज्यांमध्ये अर्बन नक्षलवादाला काही प्रमाणात बे्रक लागला आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी २०२६ पर्यंत देश नक्षलवादमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशांतर्गत सुरक्षा व्यवस्था प्रामाणिकपणे काम करीत आहे. केंद्रातील सरकारविरोधात विरोध फेक नॅरेटीव्ह पसरवत आहे. जनतेने त्यांच्या नॅॅरेटीव्ह बळू पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत अर्बन नक्षलवादी चळवळीत काम करणारी मंडळी सहभागी झाली होती, असा आरोप त्यांनी केला. न्याय, सरकार, प्रशासकीय यंत्रणेवर जनतेच्या मनात असलेल्या असंतोषाचा फायदा अर्बन नक्षलवादी चळवळीत काम करणारी मंडळी घेऊन जनतेची माथी भडविण्याचे काम ही मंडळी करीत आहेत. जनतेची माथी भडकवून देशात अराजकता माजवून सरकार पडण्याचा त्यांचा डाव आहे, त्यांचा हा डाव  देशवासीयांनी हाणून पाडला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. सरकारी व्यवस्था भ्रष्ट झाली असल्याने अर्बन नक्षलवादी हे आपले डाव साधत आहेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी गणेश जेठे व दिगंबर वालावलकर यांनी अ‍ॅड. जाधव यांना जनसुरक्षा विधयेकावर काही प्रश्न विचारले. त्याची त्यांनी समपर्क उत्तरे देतानाच देशात उजव्या किंवा डाव्या विचारसरणीची सरकारे आली तरी राज्यघटना बदलू शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाला माजी जि. प. सदस्य अकुंश जाधव, पत्रकार महेश सरनाईक, वीरेंद्र चिंदरकर, सुधीर राणे, आनंद तांबे, रोशन तांबे, संजय बाणे, परेश राऊत, मंगेश साळसकर, पंढरीनाथ गुरव, उमेश बुचडे, तुषार हजारे, विराज गोसावी, मयुर ठाकूर, विनोद जाधव, दर्शन सावंत, साहील बागवे, संजना हळदिवे आदी उपस्थित होते.