
कणकवली : सरस्वतीपूजनानिमित्त कलमठ - बिडयेवाडी येथील मुलांना समर्थ प्रा. भजन मंडळातर्फे शैक्षणिक वस्तू देण्यात आल्या. यावेळी प्रमोद लिमये, तावडे, संदीप म्हाडगुत, ज्येष्ठ नागरिक अजित पवार, ग्रा. पं. सदस्य पप्पू यादव, सचिन खोचरे, समर्थ प्रा. भजन मंडळाचे अध्यक्ष अनिकेत गुरव, प्रसाद मेस्त्री, मंगेश मेस्त्री, गणेश चाफेकर, अनिल साळसकर आदी उपस्थित होते. यावेळी सरस्वती पूजन उत्साहात पार पडले.










