
कणकवली : शिक्षण प्रसारक मंडळाचे कणकवली कॉलेज कणकवली येथे जिमखाना विभागातर्फे मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण झोन - ४ ची बुद्धीबळ स्पर्धा २५ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या दरम्यान पार पडली. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन प्रा. डॉ.राजश्री साळुंखे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य जगन्नाथ वळंजू, कोकण झोनचे समन्वयक शशांक उपशेट्ये, ग्रामीण विकास विभागप्रमुख डॉ. राजेंद्र मुंबरकर, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. डॉ. सोमनाथ कदम , जिमखाना विभागप्रमुख प्रा.हेमंत गावित उपस्थित होते.
शशांक उपशेट्ये यांनी, बुद्धीबळ हा बुद्धीला चालना देणारा खेळ असल्याचे सांगितले. डॉ. राजश्री साळुंखे यांनी, बुद्धीबळ हा खेळ जीवनाकडे बघण्याचे तत्त्वज्ञान शिकवणारा असल्याने विद्यार्थ्यांनी या खेळाकडे वळावे, असे मत व्यक्त केले. स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा प्राचार्य युवराज महालिंगे याच्या उपस्थितीत पार पडला.
या स्पर्धेत २६ महाविद्यालयांचे १०८ विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेत बुद्धीबळ पुरूष वैयक्तिक गटात साहस नारकर (डी.बी.जे. कॉलेज, चिपळूण) याने प्रथम, श्रीहास नारकर डी.बी.जे. कॉलेज चिपळूण) याने द्वितीय विपुल तांडेल (डीयूबीएसएससी ,दापोली) याने तृतीय क्रमांक मिळवला. तर बुद्धीबळ पुरुष संघ प्रथम क्रमांक डी.बी.जे. कॉलेज चिपळूण, द्वितीय क्रमांक जे.एस.एम. कॉलेज अलिबाग, आणि तृतीया क्रमांक डियूबीएसएससी दापोली यांनी पटकावला.
महिला वैयक्तिक गटात खुशी विश्वकर्मा (डी.बी.जे.कॉलेज चिपळूण,) हे ने प्रथम, शर्वरी पनवलकर (डीयूबीएसएससी, दापोली ) हे नाही द्वितीय तर अनुश्री गुरव (जीडीकेसीसी, अलिबाग) हीने तृतीय क्रमांक मिळेल. बुद्धीबळ महिला संघ प्रथम क्रमांक आर.पी .गोगटे कॉलेज, रत्नागिरी, द्वितीय क्रमांक- वायबीआयटी कॉलेज, सावंतवाडी, तृतीय क्रमांक -डीयूबीएसएससी कॉलेज , दापोली यांनी प्राप्त केला.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील जिमखाना विभाग तसेच सर्व प्राध्यापक, विद्यार्थी स्वयंसेवक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र मुंबरकर, सूत्रसंचालन प्रा. सचिन दर्पे, आभार प्रा. हेमंत गावित यांनी मानले.










