
कणकवली : अत्यवस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या प्राथमिक शिक्षक गंगाधर भीमराव कदम (५७, मूळ रा. कांदळगाव व सध्या रा. कणकवली - शिवशक्तीनगर) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १.३० वा. सुमारास घडली. अत्यवस्थ वाटू लागल्यानंतर गंगाधर यांना सर्वप्रथम कणकवलीतील खाजगी रुग्णालयात व तेथून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाला. होता गंगाधर हे साळशी प्राथमिक शाळा नंबर १ येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा असा परिवार आहे. घटनेबाबत मुलगा स्मितील गंगाधर कदम (२७, रा. कणकवली - शिवशक्तीनगर) याच्या खबरीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.










