
कणकवली : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी कणकवली शहरातील मानाचा समजला जाणारा संतांचा गणपती, रिक्षा संघटनेचा "कणकवलीचा राजा", व पोलीस स्टेशन येथील गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी रिक्षा संघटना पदाधिकारी, पोलीस निरीक्षक, अन्य अधिकारी व संतांच्या गणपतीचे मानकरी उपस्थित होते.
उपस्थितांनी राणे यांचे स्वागत केले. राणे यांनी सार्वजनिक गणपतींसह स्थानिक घरोघरी जाऊनही श्रीगणेशाचे दर्शन घेतले. सांगवे - कनेडी, भिरवंडे येथे घरोघरी श्री गणेशाचे दर्शन घेतले.यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. कणकवली येथे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष आणि रिक्षा संघटना अध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगराध्यक्ष बंडू हर्णे, महेश सावंत, संजय मालंडकर, अभय राणे, रिक्षा गणेश उत्सव समिती अध्यक्ष बाळ वराडकर, महेश आंबडोस्कर,भारत तळवडेकर, मनोज वारे, महेश कदम, बाळू वालावलकर आदी रिक्षा संघटना सदस्य,चालक आणि पदाधिकारी उपस्थित होते.










