
कणकवली : विनापरवाना वाळू वाहतूक करणारा डंपर कणकवली पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक राजेंद्र नानचे यांनी ताब्यात घेतला. ही कारवाई गुरुवारी रात्री १०.३० वाजता कणकवली - आचरा रस्त्यावर लक्ष्मी चित्रमंदिरानजीक करण्यात आली. नानचे यांनी डंपरचालक नंदू किसन पवार याच्याकडे वाळू वाहतूक परवान्याची चौकशी केली असता परवाना नसल्याचे उघड झाले. याबाबत महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नाली कांबळे यांच्या फिर्यादीनुसार आरोपी नंदू पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.