
कणकवली : कणकवली शहरातील टेंबवाडी येथील संतांचा गणपतीचं दरवर्षीप्रमाणे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी दर्शन घेतले. नाईक यांनी गणपती बाप्पाला फुलांचा हार अर्पण केला. यावेळी गार्हाणे घालताना सर्वांना सुखी, समृद्धी व उत्तम आरोग्य लाभो ही प्रार्थना केली. त्यावेळी संतांच्या गणपतीचे मानकरी सुनील सावंत यांनी अबिद नाईक यांचा सन्मान केला. यावेळी महेश कोवळे, संजय सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते.










