
कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नवीन कुर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदिप उर्फ बाळा कामतेकर ,राजेंद्र तेली,आशिष पेडणेकर यांच्या समवेत त्यांचे सहकारी गणेश साळसकर, संतोष नागावकर, विलास चव्हाण, राकेश तेली, हरिचंद्र कोलते, प्रशांत चव्हाण, आकाश कोलते, यांनी पालकमंत्री नितेश राणे यांनी नवीन कुर्ली गावात केलेल्या विकासकामांवर प्रभावित होऊन, विधानसभा प्रमुख मनोज रावराणे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सामाजिक कार्यकर्ते प्रदिप उर्फ बाळा कामतेकर, राजेंद्र तेली, आशिष पेडणेकर आणि त्यांचे सहकारी यांचे भारतीय जनता पार्टीत स्वागत केले.
या प्रवेशामुळे नवीन कुर्ली गावातील भाजपाची ताकत वाढली आहे. पक्ष प्रवेशावेळी भाजपचे कणकवली विधानसभाप्रमुख मनोज रावराणे, एस. टी. सावंत, राजेंद्र कोलते, अमित दळवी, बूथ अध्यक्ष अतुल डऊर, प्रशांत दळवी, सखाराम हुंबे, बाळा चव्हाण,प्रदीप आंग्रे, एस. टी. सेवाशक्ती संघटनेचे अध्यक्ष अरुण पिळणकर, कृष्णा परब शिवाजी चव्हाण, पांडुरंग चव्हाण, मंगेश मडवी आदी उपस्थित होते.