
कणकवली : सिंधुदुर्गच्या नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली. तृप्ती धोडामिसे यांनी नुकताच सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे यांनीही धोडमिसे यांचे स्वागत केले.
या प्रसंगी जिल्हा प्रशासनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग, जिल्ह्यातील पायाभूत सुविधा उभारणी, पर्यटन विकास, शिक्षणक्षेत्रातील सुधारणा तसेच रोजगार निर्मिती या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.










