कार्यकारी अभियंता दिनेश बागुल यांनी घेतली नीतेश राणेंची भेट

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 02, 2025 11:58 AM
views 238  views

कणकवली : सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता दिनेश बागुल यांनी पालकमंत्री नीतेश राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी पदभार स्वीकारल्यावर पालकमंत्र्यांची घेतलेली ही भेट आहे.‌ भेटीदरम्यान विभागाच्या कामकाजाबाबत चर्चा झाली. पावसामध्ये तसेच सणासुदीला सार्वजनिक बांधकामने रस्ते सुस्थितीत ठेवावेत, अशी सूचना पालकमंत्री नीतेश राणे यांनी केली. यावेळी मंत्री राणे यांनी कार्यकारी अभियंता दिनेश बागुल यांचे स्वागतही केले.