
कणकवली : कणकवली तालुक्यात पोलिसांकडून अवैध धंद्यांवर धाडसत्र सुरूच आहे. सोमवारी सायंकाळी ४.२० वा. सुमारास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कलमठ - बाजारपेठ येथे धाड टाकून २० हजार ५०० रुपये किंमतीची गोवा बनवटीची दारू जप्त केली. याबाबत संशयित महिला स्वरा संदीप कांबळी (२८, कलमठ - बाजारपेठ) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई संशयित महिलेच्या राहत्या घराच्या पाठीमागील पडवीत करण्यात आली. कारवाईमध्ये एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, हवालदार ज्ञानेश्वर तवटे, आशिष गंगावणे आदी सहभागी झाले होते.