परप्रांतीय कामगाराचा आकस्मिक मृत्यू

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 01, 2025 19:19 PM
views 85  views

कणकवली :  मूळ उत्तरप्रदेश व सध्या कणकवलीत भाड्याने राहत असलेल्या विषनी प्रसाद (४७) या परप्रांतीय कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. विषनी हे सहकारी कामगारांसमवेत कणकवली नगरपंचायतीनजीकच्या एका खोलीत भाड्याने राहत होते. रविवारी सकाळी बरे वाटत नसल्याने विषनी  खोलीवरच थांबले होते. त्यांच्यासोबतचे सहकारी कामावर निघून गेले. तर सायंकाळच्या सुमारास खोलीवर दाखल झालेल्या सहकारी कामगारांनी पाहिले असता विषनी यांच्या शरीराची कोणतीच हालचाल होत नव्हती. सोबतच्यांनी त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता विषनी यांचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत विषनी यांचे सहकारी बलिस्टर निषाद (७८, उत्तर प्रदेश) यांच्या खबरीनुसार घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.