
कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या एनसीसी विभागात वरिष्ठ अंडर ऑफिसर म्हणून नेतृत्व केलेले निशांत लिलाधर परब यांची भारतीय नौदलाच्या अग्निवीर योजनेंतर्गत निवड झाली आहे.
निशांत परब हा सर्वसामान्य कुटुंबातील आहे. त्याने बारावीपर्यंतचे पूर्ण केले. निशांत याने भारतीय नौदलाची अग्निवीर ही परीक्ष दिली. त्यात तो उत्तीर्ण होऊन भारतीय नौदलात त्याची निवड झाली. आई - वडिलांच्या कष्टाचे चिज निशांत याने केले. त्याला विद्यामंदिर प्रशालेच्या एनएसीसी विभाग प्रमुख अमोल शेळके सर यांचे मार्गदर्शन लाभले. भारतीय नौदलाची निवड झाल्यानंतर निशांतने प्रारंभिक प्रशिक्षण पूर्ण करून पुढील प्रशिक्षणासाठी त्याची चिलिखा, ओडिसा येथे निवड झाली आहे. याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.










