
कणकवली : कणकवली पोलिसांकडून शहरातील गांगोमंदिर येथील सर्व्हिस आॅपरेशन आॅल आऊट राबविण्यात आले. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी वाहनांची तपासणी केली.
तालुक्यासह शहरांमध्ये होणाऱ्या घरफोड्या, अवैध प्रवासी वाहतूक, अवैद्य होणारी गोवाबनावटीची दारू वाहतूक अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली गांगोमंदिर येथे पोलिसांनी शनिवारी सायंकाळी सात वाजता नाकाबंदी केली. यावेळी पीएसआय राजेंद्र नानचे, पोलीस हवालदार विनोद चव्हाण, महिला पोलीस विनया सावंत, पोलीस नाईक सुशांत जाधव उपस्थित होते. पोलिसांनी चारचाकी व अवजड वाहनांची तपासणी केली. मात्र, विना लायसनधारक व गाडीच्या कागदपत्रे नसणाऱ्या चालकांची धांदल उडालेली पाहायला मिळाली.