कणकवली उपजिल्हा रुग्णालयाची कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी केली पाहणी !

Edited by: उमेश बुचडे
Published on: March 13, 2024 14:42 PM
views 130  views

कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्वच्छतागृह दुरावस्थेसंदर्भात संडास बाथरूमची मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांनी वेळोवेळी वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. वारंवार होणाऱ्या तक्रारी नंतर रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांनी कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांना कळविले होते. त्याच अनुषंगाने बुधवारी सायंकाळी कार्यकारी अभियंता यांनी

 प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन दुरवस्थेत बाबत पाहणी केली. यावेळी आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे यांनी रुग्णालयातील सर्व विभाग कार्यकारी अभियंता त्यांना दाखवून तेथील समस्या त्यांच्यासमोर मांडल्या यावेळी  सर्वगोड यांनी तातडीने ठेकेदाराला बोलावून पुढील आठ दिवसात हे काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. यामध्ये स्पेशल रूमचे काम तातडीने पूर्ण करणे ,संडास बाथरूम दुरुस्ती, वार्डमधील खिडक्यांच्या काचा बदलणे ,ड्रेनेज पाईप बदलणे, गंजलेली शेटर्स बदलणे अशा विविध समस्या असल्याचे सांगितले.

यावेळी सर्वगोड यांनी आपण लवकरात लवकर हे काम करून देवगड वैभववाडी व कणकवली या तालुक्यातील महत्त्वाचे असलेले हे कणकवली उपजिल्हा रुग्णालय  सर्व सामान्य रुग्णांना चांगल्या सेवा सुविधा देण्यासाठी दर्जेदार बनवून देऊ असे आश्वासन दिले