कणकवली पर्यटन महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात !

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 10, 2024 09:35 AM
views 603  views

कणकवली : कणकवली पर्यटन महत्त्वाचे उद्या दिमाखात उद्घाटन होणार आहे. ११ जानेवारी ते १४ जानेवारी या कालावधीत होत असलेल्या या पर्यटन महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उद्या रात्री ९ वाजता उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आ.नितेश राणे, माजी आ.प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या उपस्थितीत होणार आहे.


पहिल्या दिवशी  संगीत संध्या 'रेट्रो टू मेट्रो' व 'फु बाई फु' फेम  कलाकारांचा कार्यक्रम होणार आहे. शशांक कल्याणकर यांचा ऑर्केस्ट्रा व नामवंत ७ कलाकार असणार आहेत. फु बाई फु फेम सागर कारंडे, हेमांगी कवी यांची कॉमेडी पहायला मिळणार आहे. त्यामुळे आता कणकवली वासीयांना या महोत्सवाची आतुरता लागून राहिली आहे.