
कणकवली : खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त' द पॉवर हाऊस जिम यांच्या संकल्पनेतून व माजी नगराध्यक्ष समीर जी नलावडे यांच्या सहकार्यातुन कणकवली ते कुणकेश्वर पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार नारायण राणे यांनी जिल्ह्याचा केलेला विकास आणि कोकणच्या समृद्धी साठी केलेली कामे हे नेहमीच सिंधुदुर्ग वासियांना अभिमानास्पद आहे. त्यामुळेच खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १० एप्रिल रोजी सकाळी ५ वाजता कणकवली भालचंद्र महाराज मठ ते कुणकेश्वर अशी पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याहस्ते होणार आहे. कणकवली पटवर्धन चौक येथे पदयात्रेचे स्वागत मा. सरपंच निसार शेख मित्रमंडळ यांच्यावतीने होणार आहे. तसेच बेळणे खुर्द येथे सरपंच अविनाश गिरकर, नांदगाव येथे सरपंच रविराज मोरजकर, असलदे येथे पंढरी वायंगणकर, कोळोशी येथे सरपंच ईंदप, शिरगांव येथे मा. सरपंच अमित साटम, वळिवंडे येथे नंदु देसाई, लिंंगडाळ तिठा येथे ओकांर खाजणवाडकर, तसेच लिंंगडाळ येथे संदीप साटम यांच्या तर्फे पदयात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे.