कणकवली लाकुड व्यापारी संघटना अध्यक्षपदी दीपक इस्वलकर

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 21, 2024 06:51 AM
views 244  views

कणकवली : कणकवली तालुका लाकुड व्यापारी संघटना अध्यक्षपदी दीपक इस्वलकर यांची नियुक्ती करण्यात आली.

कणकवली तालुका लाकूड व्यापारी संघटनेची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला प्रमोद सावंत, बाळा भिसे, अजित थोरबोले, महादेव पारकर, अनिल हळदिवे, सूर्यकांत मिराशी, सारंग देसाई, मधु बावकर, तात्या पाटील, श्रीकांत नेवरेकर, बाळु शेळके, आत्माराम मुळम, संजय पारकर, गोविंद पटेल, बाळु शेळके, बाबल्या बोभाटे आदी व्यापारी उपस्थित होते.

नूतन लाकुड व्यापारी संघटना अध्यक्ष दीपक इस्वलकर यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.