कणकवली तालुका शिवसेनेच्यावतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना

ढोलताशांच्या गजरात मिरवणूकीने जल्लोषात देवीचे आगमन
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 15, 2023 20:35 PM
views 119  views

कणकवली :  कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने आज घटस्थापने दिवशी  दुर्गामातेची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली.कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सपत्नीक देवीचे विधिवत पूजन व आरती केली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. देवीसाठी आकर्षक असा दरबार उभारण्यात आला आहे.तर देवीच्या आसनाला आकर्षक अशी फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

आज सकाळी  देवीची सवाद्य मिरवणूक  कणकवली बाजारपेठेतून नरडवे फाटा नजीक असलेल्या शिवसेना नवरात्रोत्सव स्थळापर्यंत जल्लोषात काढण्यात आली.यावेळी दुर्गामातेचा जयजयकार करत, फटाक्यांची आतषबाजी करून ढोलताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत आ. वैभव नाईक,जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांसह कणकवली तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या सख्येने सहभागी झाले होते. देवीच्या आगमनाचा उत्साह शिवसैनिकांकडून साजरा करण्यात आला. आजपासून बुधवार दि २५ ऑक्टोबर पर्यंत देवीची नित्यपूजा,आरती, विविध सांस्कृतिक,धार्मिक,मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी व  उपक्रमांनी नवरात्रोत्सव साजरा करण्यात  येणार आहे.

        यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभाप्रमुख सतीश सावंत, आ. वैभव नाईक यांच्या पत्नी सौ. स्नेहा नाईक,महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष रामदास विखाळे, खजिनदार प्रदिप मसुरकर, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये,जेष्ठ शिवसैनिक अनिल हळदिवे,तालुकाप्रमुख शैलेश भोगले, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत,सचिन सावंत,बंडू ठाकूर,सतीश नाईक,राजू राणे, हर्षद गावडे, रूपेश आमडोस्कर, सिद्धेश राणे,महेश कोदे,योगेश मुंज, संतोष परब, तेजस राणे, उत्तम लोके,सचिन आचरेकर, विलास गुडेकर,भालचंद्र दळवी,संतोष पुजारे,धिरज मेस्त्री,नितेश भोगले,सचिन खोचरे,तालुकाप्रमुख वैद्येही गुडेकर, प्रतीक्षा साटम,स्वरूपा विखाळे,दिव्या साळगावकर, अरुण परब,रोहित राणे,संजय पारकर, बाळा आर्डेकर,जयसिंग नाईक, पराग म्हापसेकर,लक्ष्मण हन्नीकोड यांसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.