कणकवली - मुख्यालय एसटी बंद !

प्रवाशांचे हाल
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 27, 2023 14:42 PM
views 114  views

सिंधुदुर्गनगरी :  २७ कणकवली सिंधुदुर्ग नगरी एसटी बस बद केल्यामुळेमुख्यालयात कामानिमित्त येणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि नागरिकांची गैरसोय होत आहे एस टी महामंडळाच्या सततच्या या प्रकारामुळे लेटमास्टर चा फटका बसत असल्याने कर्मचाऱ्यात नाराजी आहे याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देतील का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे .

      जिल्ह्याचे मुख्यालय सिंधुदुर्ग नगरी येथे कणकवली सिंधुदुर्ग नगरी कणकवली अशी एसटी सेवा गेले कित्येक वर्ष सुरू आहे परंतु गेल्या सहा महिन्यापासून आणि आता परत सततच्या एसटी बंद ठेवण्याच्या प्रकारामुळे कर्मचाऱ्यात नाराजी आहे कामानिमित्त येणाऱ्या कर्मचाऱ्यांना लेट मास्टर आणि उशीर होत आहे ची कणकवली सिंधुदुर्ग नगरी ऐवजी कणकवली सावंतवाडी सोडून सदरची गाडी मुख्यालयात येत नाही सायंकाळच्या सत्रात सिधुदुर्गनगरी कणकवली बस बंद केल्लाने कर्मचार्याना पायपिट करावी लागते दिवसलहान झाल्यामुळे कर्मचार्याना काळोखातून ओरोस तीठा पर्यत पायपिट करावी लागते काहीवेळा सरपटणाऱ्या जनावराचा फटका सहन करावा लागतो तसेच जातायेता कामानिमित्त येणाऱ्या कर्मचाऱ्यांना गर्दीचा त्रास सहन करावा लागत आहे कणकवली सिंधुदुर्ग नगरी सोडणे गैरसोयीचे होत असल्यास कणकवली कुडाळ किंवा कणकवली सावंतवाडी अशी पर्यायी जादा सकाळ संध्याकाळ कर्मचाऱ्यांच्या वेळेत बस सुरू करावी अशी मागणी यापूर्वी केली आहे. परंतु एसटी महामंडळाच्या या ढिसाळ कारभाराचा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहेत्यामुळे कर्मचाऱ्यांना लेट थम मास्टरचा फटका बसत आहे या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी कर्मचाऱ्या वर्गात होत असून काही कर्मचाऱ्यांनी संबंधित डेपो व्यवस्थापक यांना निवेदनही दिले आहे.

परंतु त्याचा योग्य पद्धतीने उपयोग न होता मुख्यालयात येणारी कणकवली एसटी बंद ठेवण्यात स्वारस्त मानले जात आहे याकडे कोणी लक्ष देईल का असावा कर्मचारी वर्गाने व्यक्त केला आहे .