कणकवलीला वादळी पावसाचा तडाखा !

100 पेक्षा जास्त विजेचे पोल तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 16, 2024 14:56 PM
views 381  views

कणकवली : कणकवली शहरासह आजूबाजूच्या गावामध्ये दुपारी दोन च्या सुमारास वादळी पावसाचा तडाखा बसला.  यामध्ये हरकुळ ,कळसुली, साकेडी कलमठ ,हळवल,नागवे, यासह आजूबाजूतील तालुक्यामधील गावांना हा वादळीवाराचा तडाखा बसला. काही जणांच्या घर मांगर यावर घातलेली कवले व पत्रे उडून गेले तर काहीजणांचे कवले देखील उडून गेली त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. हरकुळ कांबळे वाडी येथील सुनील सोहनी यांच्या घरावरील 20000 स्क्वेअर फुटचे पत्र्याचे छप्पर, हे समोरील अंगणात असलेल्या 1800 स्क्वेअर फुटच्या छपरावर पडल्याने त्याच्या चपराचे देखील नुकसान झाले.

 तसेच नवीन घराच्या भिंती देखील मांगरावर पडल्या त्यामुळे शेतमांगराचे देखील नुकसान झाले आहे. साधारणतः या शेतकऱ्याचे साडेतीन लाख रुपये नुकसान झाले असल्याचे समजत आहे.

100 पेक्षा जास्त पोल या वादळी वाऱ्याने तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. यामध्ये लघुदाबाचे 70 पोल या वाऱ्यामुळे मोडकळले. तर उच्च दाब म्हणजेच इलेव्हन केवीचे 32 पोळ या या वादळी वाऱ्यात पडले. कणकवली शहरासह आजूबाजूच्या गावांमधील विद्युत पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला होता.