
कणकवली : कणकवली पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल अमोल परशुराम जाधव (२९, रा. कनकनगर – कणकवली) हे बेपत्ता झाल्याची फिर्याद त्यांच्या पत्नीने पोलिसांत दिली आहे. कॉन्स्टेबल अमोल जाधव कणकवली पोलीस हे बुधवारी ठाण्यात वायरलेसवर कार्यरत होते. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास ते घरी जेवायला जातो म्हणून गेले ते घरी आलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नीने पती बेपत्ता असल्याची फिर्याद दिली आहे.