कणकवली पोलिस निरीक्षकपदी अमित यादव...!

आज स्वीकारणार पदभार
Edited by: उमेश बुचडे
Published on: July 01, 2023 11:24 AM
views 489  views

कणकवली : कणकवली पोलीस निरीक्षकपदी अमित यादव यांची नियुक्ती करण्यात आली असून, आज शनिवारी ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत याआधी त्यांनी वैभववाडी पोलीस निरीक्षक पद सांभाळलं होतं.

कणकवली पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले प्रभारी पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांची बदली रायगड जिल्हयात झाली आहे. 

नवीन पदभार स्वीकारणारे पोलीस निरीक्षक अमित यादव त्यांनी वैभववाडीत बऱ्याच गुन्ह्यांचा उलगडा केला होता तसेच अवैध धंद्यांवर देखील कारवाई केली होती. त्यामुळे कणकवली तालुक्यात होणाऱ्या होणारे गुन्हे रोखून झालेल्या गुन्ह्यांचा सखोल तपास करावा आणि अवैध धंद्यांचा देखील छडा त्यांनी लावावा अशीच अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.