KANAKAVALI POLICE ROCKS | 2011 च्या बॅचने वृद्धाश्रमाला केली मदत

धान्य, मिठाई व कपडे देत जपली सामाजिक बांधिलकी
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 13, 2023 16:18 PM
views 347  views

कणकवली : कणकवली पोलिसांच्या 2011 च्या बॅचने आपल्या बॅचला 11 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल असलदे येथील वृद्धाश्रमाला धान्य कपडे मिठाई भेट देत सामाजिक बांधिलकी जपली.  या बॅचने गेट-टुगेदरचे आयोजन केले होते. तसेच गरजू व्यक्तींना मदत करण्याचे नियोजन देखील केले होते. त्यानिमित्ताने त्यांनी असलदे येथील वृद्धाश्रमात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्याशी काही वेळ चर्चा केली व त्यांना धान्य, मिठाई व कपडे देत सामाजिक बांधिलकी जपली.  

यावेळी रुपेश गुरव, मनोज गुरव, उद्धव साबळे, पराग मोहिते, दिगंबर घाडीगांवकर, प्रवीण पार्सेकर सचिन माने, उद्देश कदम, सुप्रिया भागवत, रोहिणी कुंभार, विनया सावंत उपस्थित होते.