शिष्यवृत्ती परीक्षेत कणकवली क्र. ३ शाळेचं सुयश...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 17, 2023 11:33 AM
views 257  views

कणकवली : येथील सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय जिल्हा परिषद शाळा कणकवली क्रमांक तीन च्या अन्वय देसाई व गाथा कांबळे या विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान मिळवत शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.

सन 2022 - 23 मध्ये झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक  शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला या परीक्षेत शाळा कणकवली क्रमांक तीनचा इयत्ता पाचवीचा कुअन्वय अच्युत देसाई हा 214 गुण मिळवून जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत चौतीसावा आला तर कु. गाथा अमोल कांबळे ही 204 गुण मिळवून जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत 49 वी आली.

या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका सौ रूपाली डोईफोडे यांच्यासह वर्षा करंबेळकर, लक्ष्मण पावसकर, अश्विनी साटम, स्वाती कदम, श्रेया राणे व अश्विनी परुळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा करंबेळकर तसेच सर्व सहकारी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. दरवर्षी सातत्याने शाळा कणकवली क्रमांक तीनचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत येत असतात यशाची ही परंपरा कायम राखल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र सावंत, उपाध्यक्ष सायली राणे सर्व व्यवस्थापन समिती सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे व शाळेचे विशेष अभिनंदन केले आहे. पालक वर्गातूनही या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक होत आहे.