कणकवली न.पं.च्या वतीने 'एक तारीख -एक तास -एक साथ' श्रमदान

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 01, 2023 19:23 PM
views 198  views

कणकवली :  कणकवली नगरपंचायतीच्या वतीने महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा २०२३ अंतर्गत ०१ आक्टोंबर २०२३ स्वच्छता दिवस (एक तास-एक साथ श्रमदान मोहीम) या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले. 

  स्वच्छता ही सेवा उपक्रम अंतर्गत वॉर्ड निहाय गेले तीन दिवस नगरपंचायतीच्या वतीने शहरात 19 ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले तसेच आज ०१ ऑक्टोंबर स्वच्छता दिवस चे औचित्य साधून नगरपंचायतीच्या वतीने निश्चित केलेल्या  ठिकाणी पटवर्धन चौक ते बस स्टँड परिसर कणकवली, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांत अधिकारी कार्यालय, प्रांत अधिकारी कार्यालय ते  नरडवे फाटा , नरडवे फाटा परिसर व कनक नगर गणपती सान या ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन कणकवली नगरपंचायतीचे प्रशासक श्री. जगदीश कातकर व मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले .

    यावेळी कणकवली  मतदारसंघाचे आमदार नितेश राणे तसेच कणकवली नगरपंचायत प्रशासक तथा प्रांतअधिकारी जगदीश कातकर,  कणकवली पंचायत समिती गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,  कणकवली नगरपंचायत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, कणकवली नगरपंचायत माजी उपनगराध्यक्ष गणेश हर्णे, कणकवली पंचायत समिती माजी सभापती मनोज रावराणे, नगरपंचायत अधिकारी,  कर्मचारी, शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, रोटरी क्लब , भाजीपाला विक्रेता संघ, रिक्षा युनियन संघटनेचे पदाधिकारी, शहरातील तरुण मंडळ मोठया संख्येने सहभागी झाले होते.