कणकवली नगरपंचायतीला 'हरित - महासिटी कंपोस्ट' ब्रॅड वापरण्यास परवानगी

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 09, 2024 20:20 PM
views 215  views

कणकवली : कणकवली नगरपंचायतीला  स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत "हरित - महासिटी कंपोस्ट" ब्रॅड वापरणेस परवानगी मिळाली आहे. स्वच्छ महाराष्ट्र (नागरी) अंतर्गत शासन निर्णयान्वये राज्यातील शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापन करताना, शहरात निर्माण होणाऱ्या विघटनशील (ओला कचरा व सुका पालापाचोळा) कचऱ्यावर प्रक्रिया करून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताची विपणन व विक्री (Marketing & Sales) करण्यासाठी "हरित - महासिटी कंपोस्ट" हा शासनाचा नोंदणीकृत स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत "हरित - महासिटी कंपोस्ट" ब्रँड वापरण्याची परवानगी देण्यात येते. कणकवली नगरपंचायत मार्फत हरित ब्रॅड वापरण्यास परवानगी मिळण्याबाबत अर्ज व खत तपासणी अहवाल राज्य शासनाकडे पाठविला होता.

कणकवली नगरपंचायतीच्या  घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात ओल्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या कंपोस्ट खतास राज्य शासनाचा "हरित महासिटी कंपोस्ट" हा ब्रँड वापरण्यास स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) संचालनालयातर्फे मान्यता देण्यात आली आहे. कणकवली नगरपंचायतीकडून घराघरातून दररोज ३ टन ओला व २ टन सुका कचरा संकलन केले जाते. Organic waste machine आणि windrow composting द्वारे ओला कचरा प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार केले जाते. या कंपोस्ट खतामध्ये शेतजमिनीला आवश्यक घटक मूलद्रव्ये आहेत. जड धातूचे कोणतेही घटक नाहीत. या खतनिर्मितीमध्ये कोणत्याही रासायनिक घटकाचा वापर करण्यात आलेला नाही. शहरातील शेतकऱ्यांना कमी खर्चात कंपोस्ट खत प्रती किलो ५ रूपये प्रमाणे सर्व नागरिकांना उपलब्ध होईल.शेतीमध्ये या खताचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी  केले आहे.