कणकवलीत ऑनलाइन व्हिडिओ गेम जुगारावर पोलिसांची धाड !

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 25, 2023 10:18 AM
views 943  views

कणकवली : तळेरे बाजारपेठ येथे गैर कायदा बिगर परवाना ऑनलाइन  व्हिडिओ गेम वर पोलिसांनी धाड टाकली ही कारवाई मंगळवारी 24 ऑक्टोबर रोजी 1:30च्या सुमारास धाड टाकली. 

यामध्ये 10000 रुपयांचा इलेक्ट्रिक व्हिडिओ गेम मशीन व रोख रुपये 6900 असा एकूण 17 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तर प्रसाद सखाराम घाडीगावकर वय 35 वर्षे राह. कसवण गावकरवाडी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.