कणकवली विधानसभेसाठी मतपेट्या मतदानकेंद्रावर रवाना

332 मतदान केंद्रावर उद्या मतदान
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 19, 2024 15:57 PM
views 385  views

कणकवली : सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी उद्या ता.२० रोजी मतदान होत आहे. याकरिता कणकवली विधानसभा मतदारसंघतील ३३२ मतदान केंद्रांवर मंगळवारी येथील एचपीसीएल हॉल येथून ईव्हीएमसहित इतर साहित्य रवाना करण्यात आले.या संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी २३०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत असणार आहेत.

  कणकवली विधानसभा मतदारसंघात एकुण सहा उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये महायुतीचे उमेदवार नितेश राणे, महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्यासहित अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी, संदेश परकर, गणेश माने व बहुजन समाज पक्षाचे चंद्रकांत जाधव हे रिंगणात आहेत.यांच्यासाठी बुधवारी कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील ३३२मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.त्याकरिता आज (ता.१९) मतपेट्या मतदानकेंद्रावर दाखल झाल्या आहेत.सकाळी ४५ एसटी बस व २७ जीप गाड्यांच्या माध्यमातून हे साहित्य रवाना करण्यात आले.ही मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी १३९७ कर्मचारी, जवळपास ७०० पोलीस व होमगार्ड, १०७ राखीव कर्मचारी, ४७ झोनल अधिकारी,६२  मायक्रो ऑब्जरवर असे सुमारे २३००अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आहेत.आज हे अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना झाले. 

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांच्यासहित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे, लक्ष्मण कसेकर सूर्यकांत पाटील, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव, मंडळ अधिकारी दिलीप पाटील, संतोष नागावकर, मेघनाथ पाटील यांच्यासहित इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. श्री कातकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या बसेस रवाना करण्यात आल्या.